फलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) जुलै २०२१पासून दूर-शिक्षणाद्वारे तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एम.ए.(ज्योतिष) अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सदर अभ्यासक्रमामध्ये पंचाग, मुहूर्त, कुंडली, ग्रहणवेध, ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आदींचा समावेशअसणार असल्याची माहिती विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली आहे. सन २००१मध्ये यूजीसीच्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करण्याचानिर्णय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. परंतु ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्रो. यशपाल आणि इतर अनेक वैज्ञानिकांनीविरोध केल्याने सदर प्रस्ताव रद्द करावा लागला होता. ही पार्श्वभूमी असतानादेखील २०२१मध्ये कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पुन्हा एकदा हाच विषय आणण्याच्या …